"हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांनी बनवला रुग्णांसाठी स्वयंपाक "
.
आज संपूर्ण जगात "कोरोना" व्हायरस या विषाणुने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. मृत्युचे तांडव सुरु आहे.संपूर्ण जगच या कोरोनोच्या दहशतीखाली आहे.आपल्या भारत देशात ही हा व्हायरस थैमान घालत आहे.प्रंचड दहशत या कोरोनो व्हायरस मुळे पसरली आहे. यामुळे 21 दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले आहे .अत्यावश्यक सेवा वगळता अहमदनगर जिल्हा संपूर्ण बंद आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यामधून शहरात हाॕस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या दोन वेळच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्व हॉटेल्स आणि खानावळी बंद आहेत . रुग्णाची व नातेवाईक यांची गैरसोय टाळण्यासाठी येथील विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व अथर्व टेस्ट ट्युब बेबी सेंटर च्या वतीने अतिशय महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रम राबविला आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार अहमदनगर येथील विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व महिला डॉक्टरांनी पुढाकार घेऊन हॉस्पिटल मधील परिचारिका आणि महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेऊन रुग्णसेवेबरोबरच मागील काही दिवसांपासून स्वतःच्या हाताने रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंपाक करण्याचे काम हाती घेतले आहे.
तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटल बरोबरच आणखी काही हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देखील हि सुविधा पुरविण्यात येत आहे .
विघ्नहर्ता हॉस्पिटलने या मानवतावादी उपक्रमातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.या कामी नगर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे.
अशाच एका प्रसंगी विघ्नहर्ता हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईकांना पौष्टिक जेवण देताना विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संचालिका स्ञीरोग तज्ञ डॉ . सुप्रिया वीर,डॉ.निलोफर धानोरकर ,हृदयरोग तज्ञ् डॉ.प्राजक्ता पारधे,अस्थिरोगतज्ञ् डॉ .महेश वीर , डॉ . अमित कुलांगे डॉ . अखिल धानोरकर,न्युरो सर्जन डॉ . प्रशांत जाधव ,प्लास्टिक सर्जन डॉ.नरेंद्र मरकड, भूल तज्ञ् डॉ. निस्सार सय्यद,डॉ.महादेव रंधाळे,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाचे उपाध्यक्ष प्रा.सीताराम काकडे, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अरविंद डिक्कर व सहकारी गौतम आढाव,शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी किशोर मुनोत,हरजीतसिंग वाधवा,श्री.सोहनी,श्री नारंग,श्री.रपारिया,अमित लोंढे हे या कामी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या या उपक्रमाचा आदर्श सर्वांनीच घ्यावा असाच हा उपक्रम आहे.असे म्हणत शहराचे आ.संग्रामभैय्या जगताप यांनी विशेष कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment